
हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक: नाशिक शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
जयश्री सोनवणे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. जयश्री सोनवणे ही युवती तिच्या भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात जयश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ सुमित सोनवणे जखमी झाला आहे.
यानंतर त्या भरधाव पिकअपने आणखी दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या दुर्घटनेत दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवकही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी अपघातानंतर पिकअप चालकाला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले की, वाहन चालवताना त्याच्या मांडीवर बसलेल्या मुलाने अॅक्सेलेरेटरवर पाय दिल्यामुळे गाडीचा वेग अचानक वाढला आणि त्यामुळे अपघात झाला. मात्र, अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या प्रकरणाची नोंद म्हसरूळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी…
नाशिकमध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी…
पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू…
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

