
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला…
नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज (गुरुवार) येथील श्री हजूर साहिब अंतर्गत असलेल्या माता साहेब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला झाला. एका हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुखबीर सिंग बादल गुरुद्वाराकडे जात असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांच्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हल्लेखोराला रोखले; मात्र या झटापटीत बादल जखमी झाले. आज दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
View this post on Instagram
विशेष सुरक्षेत तैनात असलेले पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्यावरही माता साहेब गुरुद्वाराजवळ हल्ला झाला ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. या घटनेपूर्वी गुरुवारी सकाळी सुखबीर सिंग बादल यांनी आपल्या कुटुंबासह श्री हजूर साहिब येथे दर्शन घेतले होते. हा हल्ला झाला तेव्हा त्यांच्या पत्नी आणि अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यादेखील तेथे उपस्थित होत्या. घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिऑमध्ये बादल यांच्या उजव्या हाताला केसरी कापड बांधलेले दिसत होते.
दरम्यान, सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 4 डिसेंबर 2024 रोजी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर (गोल्डन टेम्पल) त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते. बंदूकधाऱ्याला वेळीच पकडल्यामुळे बादल यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. 2007 ते 2017 या कालावधीत पंजाबमधील अकाली दलाच्या राजवटीत झालेल्या चुकांमुळे अकाल तख्तने दिलेल्या धार्मिक शिक्षेनुसार (तनखाह) बादल सुवर्ण मंदिरात ‘सेवादार’ म्हणून सेवा बजावत असताना 2024 मधील तो हल्ला झाला होता.
पुणे गँगवॉर! अक्षय म्हस्के हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
बीड! किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो म्हणत केला हल्ला…
लग्न लागले अन् नवरदेवावर केला चाकूने हल्ला; हल्लेखोर निघाला…
उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; आरोपीला अटक…
पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश; शिक्षक निघाला गद्दार…

