पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…

पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील युवतीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीचा अँगल आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० पोलिस कर्मचारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली. कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या युवतीने आपल्यावर बुधवारी (ता. २) अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. तक्रारीवरून संभ्रम निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी कडक अॅक्शन घेतली आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित युवक हा ‘कुरिअर कंपनीतील कर्मचारी’ नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे, घटनेतील ‘कुरिअर बॉय’ची कथा आता वेगळीच असल्याचे समोर आले आहे. युवतीने मुद्दामहून तरुणाला जाळ्यात अडकवले अन् त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर आता पोलिसांनी समोरासमोर बसून चौकशी केल्यानंतर आता युवतीने आपणच सगळं कृत्य केल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात संबंधित मित्राला तात्काळ अटक केली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. “या प्रकरणात मित्राला अटक करण्यात येणार नाही. पोलिसांनी तपासात सहकार्य करावे, तसेच तपासकामी बोलावण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली. युवकाला पुणे शहराबाहेर जाण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! कोंढव्यातील पीडित युवतीने पोलिसांनाच केला उलट प्रश्न अन् अडकली…

पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…

IT कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांचा चोरून बनवला व्हिडिओ; मोबाईलमध्ये क्लीप…

पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…

पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…

पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!