
पुणे! युवकावर अत्याचार करणाऱ्या गौरीचा आणखी एक प्रताप समोर…
पुणे: एका महिलेने गुंगीचं औषध देत युवकाचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणातील आरोपी महिला गौरी वांजळे हिचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तिच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी गौरी वांजळे हिने पती-पत्नीच्या कौटुंबीक वादातील प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने तिने एका व्यक्तीकडे तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं उघड झाले आहे. मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरी वांजळे हिच्याविरोधात एका व्यक्तीने (वय ३८) तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. या केसमध्ये ‘हायकोर्टातील वकील’ असल्याचे भासवून गौरी वांजळे हिने फिर्यादीशी जवळीक साधली. केसमध्ये मदत करते असे सांगून तिने फिर्यादीला विश्वासात घेतले आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू केले. त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गौरी वांजळे हिच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात यापूर्वीच एका युवकाच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. या महिलेने पीडित पुरुषाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आणि त्याचे काही अश्लील फोटो काढले. याच फोटोंच्या आधारावर ती फिर्यादीकडे मोठ्या रकमेची मागणी करत होती. पैशांची मागणी पूर्ण न केल्यास ‘खोट्या केसमध्ये अडकवण्याची’ धमकीही ती देत होती.
आरोपी महिलेने तिच्या पुणे येथील राहत्या घरी तसेच कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी जाऊनही त्याच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याहूनही धक्कादायक म्हणजे, तिने फिर्यादीला बळजबरीने धार्मिक स्थळ असलेल्या वाराणसी (काशी विश्वनाथ) येथेही नेले आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एकाच महिलेवर दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खंडणी आणि अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…
पुणे! तुला आणि तुझ्या मालकाला जिवंत सोडणार नाही अन् हल्लेखोराचाच मृत्यू…
पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…
पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…
पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…

