
पुणे शहरातील नांदेड सिटी भागात धुणी-भांडी करण्याच्या नावाखाली चोरी…
पुणे (शरयू माने): पुणे शहरातील नांदेड सिटी भागात फ्लॅटमध्ये काही महिला धुणी-भांडी करण्याच्या नावाखाली चोरी करत आहेत. कुटुंबातील नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.
पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी भागात घरांमध्ये चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत चालले आहे. घरात धुणी भांडी आणि स्वयंपाकाची कामे करणाऱ्या महिला घरातील काही दिवस अंदाज घेऊन हे कृत्य करत आहेत. चौकशीनंतर या काम करणाऱ्या महिला नांदेड फाट्यावरून काम करायला येतात. पुढे काही दिवस काम चांगल्या प्रकारे करतात. फाट्यावरही काही ठिकाणी काम करून त्या एकट्या दुकट्या महिलांना धमकावून जास्ती दिवस काम केल्याचे सांगून शेजारी पाजारी जिथे कामाला जातात तिथे कांगावा करून पैसे उकळतात.
दरम्यान, प्रतिष्ठेसाठी काही महिला मुकाट्याने पैसे देतात. भांड्यांची स्वयंपाकाची कामे करणाऱ्या महिला दुचाकी वरून फिरत आहेत. दिखावा करून काम पटकावत असून, नागिरकांनी सावध राहावे व जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात पत्नीच्या दुसऱ्या पतीचा कुटुंबियांसमोरच केला खून…
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…
पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…
हाय प्रोफाईल चोर! पुणे शहरात विमानाने येऊन चोरी करणारी टोळी गजाआड…

