पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाटावर पोलिसांच्या वाहनाला ट्रकने जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शिवाय, दोन जण जखमी झाले आहेत. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर देवरी मासुलकसा घाट येथे लोखंडी सळया घेवून जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने वाहतूक पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तर एक सहायक पोलिस निरीक्षक व एक वाहतूक पोलिस असे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. मनिष बहेलीया असे या घटनेतील मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर दिनेश लील्हारे व योगेश बनोटे अशी या घटनेत जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
नागपूरकडून रायपूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या लोखंडी सळया भरलेल्या ट्रक क्रमांक सी. जी. ०८- ए के १४०२ नी विरुद्ध दिशेने देवरीवरुन सडक अर्जुनीकडे येत असलेल्या महामार्ग वाहतूक पोलिसांच्या वाहन क्रमांक एम.एच.१२/ आर. टी.९६२५ या वाहनाला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये मनीष बहेलिया हे गंभीर जखमी झाले होते, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश लिल्हारे व हवालदार योगेश बनोटे हे या अपघातात जखमी झाले आहेत, त्यांच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…
पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…
पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…
धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…