दुबईवरून भारतात येताना प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं लाखो रुपयांचं सोनं; पण…

जयपूर (राजस्थान) : दुबईमधील अबुधाबीवरून भारतात आलेल्या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक किलो पेक्षा जास्त सोनं लपवल्याचे समोर आले. जयपूर एअरपोर्टरवर प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रवाशाचा एक्स रे काढल्यानंतर त्यात ही बाब समोर आली. यासाठी न्यायालयाची खास परवानगी पोलिसांनी काढली.

जयपूर एअरपोर्टवर कस्टम विभागाने अबुधाबीहून जयपूरला आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करी प्रकरणी अटक केली आहे. प्रवाशाने प्रायव्हेट पार्टमध्ये एक किलोपेक्षा अधिक सोनं लपवलं होते. महेंद्र खान असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘पकडण्यात आलेल्या सोन्याची किंमत ९० लाखांपेक्षा अधिक आहे. महेंद्र खान बुधवारी जयपूर विमानतळावर आला होता. तो सोन्याची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे चौकशी पथकाने त्याला अडवले आणि तपासणी केली.

प्रवाशाने सोनं शरिरात लपवले असल्याचा संशय कस्टम विभागाला होता. त्याच्या एक्स रे तपासणीसाठी न्यायालयातून परवानगी घेण्यात आली. आरोपीला रुग्णलयात दाखल करत एक्सरे काढण्यात आला. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सोन्याचे तीन कॅप्सूल होते. जप्त करण्यात आलेल्या शुद्ध सोन्याचं वजन ११२१ ग्रॅम इतकं आहे. त्याची अंदाजे किंमत ९०.१२ लाख रुपये एवढी आहे.

पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

विमानतळावर तपासणी करतानाच परदेशी महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये…

नागपूरच्या विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!