पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…

जयपूर (राजस्थान): भारतीय महिला अंजू ही तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे पोहचली असून, तिने हा प्रवास वाघा बॉर्डर पार करून केला आहे. अंजू पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर चर्चेत आली आहे. यानंतर अंजूचे वडील प्रसाद थॉमस यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे.

प्रसाद थॉमस म्हणाले, ‘मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले नाही. अंजूनेही कधी आपल्याला कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही. अंजूच्या सनकी स्वभावामुळे तिला सोडून दिले होते. ती बहुतांशवेळा उत्तर प्रदेशातील कैलोर येथे नातेवाईकांकडे वास्तव्याला होती. मुलीचे उचललेले पाऊल योग्य नाही. मुलगी सनकी स्वभावाची आहे.’

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले आहे. दोघांना २ मुले आहेत. अंजू पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली आहे. २१ जुलैला ती पाकिस्तानात पोहचली. पाकिस्तानमध्ये फिरायला आले असून, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच मी पाकिस्तानात आले आहे, असे अंजूने म्हटले आहे. भिवाडीहून पाकिस्तानात कशी पोहचली असा प्रश्न अंजूला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, ‘मी वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. सुरुवातीला भिवाडीहून दिल्लीला गेले. त्यानंतर अमृतसर, तिथून वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. पाकिस्तानात एका मित्राच्या घरी थांबली आहे. त्याचे कुटुंब खूप चांगले आहे.’

अंजू म्हणाली, ‘माझी तुलना सीमा हैदर हिच्याशी करणे चुकीचे आहे. दोन वर्षापूर्वी ओळख नसरुल्लाहसोबत झाली. २०२० मध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहशी माझी ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांसोबत नंबर एक्सेंज केले. व्हॉट्सअपवर बोलणे होऊ लागले. त्याबाबत आई आणि बहिणीला मी पहिल्याच दिवशी सगळे सांगितले होते. मी पुन्हा भारतात येणार आहे आणि पाकिस्तानात सध्या मी सुरक्षित आहे.’

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!