
Video: एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याची रंगली जोरदार चर्चा…
पाटणा : बिहारच्या जुमई जिल्ह्यातील सिकंदरा पोलिसांनी एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. साहब आईए, आपका स्वागत है… असे म्हणत येथील पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिथलेश कुमार असे बोगस आयपीएस बनलेल्या युवकाचे नाव आहे.
मिथलेश कुमार याची 2 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. मिथलेश कुमार हा लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलिस ठाणे क्षेत्रातील गोवर्धन बिघा गावचा रहिवाशी आहे. मिथलेश कुमार याची 2 लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली असून नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
मिथलेश हा आयपीएसची वर्दी, डोक्यावर टोपी, कमरेला पिस्टल लटकवून आपल्या घरातून दुचाकीवरून निघाला होता. मिथलेश हा सिकंदरा चौक येथे थांबला असता त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मिथलेशचा अवतार पाहून अनेकांना ही बोगसगिरी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे, गर्दीतील एकाने सिकंदरा पोलिस ठाण्याचे अधिकारी मिंटू कुमार सिंह यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर, सिकंदरा पोलिसांनी मिथलेश कुमारला येथून ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक आणि आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
मिथलेश याची मनोज सिंह याने पोलिसांत नोकरी लावतो म्हणत, त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे, मिथलेशने आपल्या मामाकडून 2 लाख रुपये घेऊन मनोज सिंह याला दिले. आपल्याला पोलिस खात्यात नोकरी लागेल, या अपेक्षेने त्याने पैसे दिल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे मनोज सिंह याने 2 लाख रुपये घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी आयपीएसची खाकी वर्दी, पिस्टल आणि टोपीही मिथलेशला दिली. त्यामुळे, नवी वर्दी घालून आईचा आशीर्वाद घेऊन मिथलेश मनोज सिंह याच्याकडे उरलेले 30 हजार रुपये देण्यासाठी निघाला असताच त्याच्या रंगरुप आणि पेहरावावरुन त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यामुळे, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची राज्यात व सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…
राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्यांच्या बदल्या; पाहा यादी…
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

