अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…
कराची (पाकिस्तान): भारतीय महिला अंजू हिने धर्मांतर केल्यानंतर नसरुल्लाह याच्याशी निकाह केला आहे. तिचा निकाहनामा व्हायरल झाल्यामुळे या दोघांच्या प्रेम कहाणीची भारत आणि पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे.
दोन मुलांना सोडून अंजू पाकिस्तानात गेली. त्यानंतर तिने नसरुल्लाहशी निकाह केला आहे. आता या प्रकरणात अंजू आणि नसरुल्लाहकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. नसरुल्लाहने तर अंजूची भारतात हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. नसरुल्लाह याने म्हटले आहे की, ‘पाकिस्तान सरकार अंजूला सरकारी नोकरी देणार आहे. तसेच तिला घरही देणार आहे. काही दिवसात अंजू भारतात येईल. भारतात ती मुलांसाठी येणार आहे. मुलांना पाकिस्तानात घेऊन जाण्यासाठी ती भारतात येणार आहे. अंजू पाकिस्तानातून भारतात गेल्यानंतर ती परत आली नाही तर तिला घेऊन येण्यासाठी मी स्वत: भारतात जाईल.’
न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, ‘अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार आहे. तिने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याने तिला पाकिस्तानचे नागरिकत्वही मिळणार आहे. अंजू जे काही करत आहे ते तिच्या इच्छेनुसार करत आहे. ती ऑगस्टमध्ये भारतात येईल. मुलांना घेऊन ती परत पाकिस्तानला येईल. भारतात अंजूची हत्या होऊ शकते. मी भारतात गेल्यावर माझ्यावर हल्ला होऊ शकतो. ती भारतातून परत आली नाही तर मी स्वत: भारतात जाऊन तिला घेऊन येईल. तिच्या मुलांनाही सोबत घेऊन येईल. तिच्या मुलांचे धर्मांतर करणार नाही.’
अंजूवर कोणताच दबाव टाकण्यात आलेला नाही. तीन वर्षापासून ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. तिने घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे, असं सांगतानाच केवळ मुलांसाठीच अंजू भारतात जाणार असल्याचे नसरुल्लाह याने स्पष्ट केले.
Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…
पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…
अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…
प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…
परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…
Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…