वाशिम हादरलं! चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारलं…
वाशिम : वाशिमच्या कारंजा शहरामध्ये चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कारंजा शहरातील गौतम नगर भागात ही घटना घडली आहे. या चार बहिणींच्या भावाचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, यानंतर चारही बहिणींनी मिळून महिलेला दगड विटांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
मृत्यू झालेली महिला आणि चार बहिणींच्या भावामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्यामुळे चार बहिणींनी या महिलेला मारहाण केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी चारही महिलांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास कारंजा शहर पोलिस करत आहेत.
महिलेला मारहाण करणाऱ्या चारही बहिणींचे वय 20-22 वर्ष ते 34-35 वर्षांमध्ये आहेत. या चारही बहिणींनी मृत महिलेच्या डोक्यात विटांनी मारहाण केली. डोक्यात जखम झाल्यानंतर महिलेला रक्ताची उलटीही झाली. स्थानिकांनी तिची या चार महिलांच्या तावडीतून सुटका करत तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास घेतला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
माजी सैनिकाने आईसह भाऊ, वहिनी आणि 3 चिमुकल्यांची क्रूरपणे केली हत्या…
पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
कोपरगाव हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून…
IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…
भारतातील आरोपीच्या घरातील बोगदा निघायचा दुसऱ्या देशात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…