पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पुणे (तेजस फडके): पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दोन वर्ष कालावधी केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून बदला करण्यात आल्या आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक पदाच्या या बदल्या असून नारायणगाव पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे. यवत पोलिस ठाण्यामध्ये असलेले केशव वाबळे यांची शिक्रापूर पोलिस ठाण्यात, तर शिक्रापूर पोलिस ठाण्यातील नितीन अतकरे यांची शिक्रापूर पोलिस ठाण्यातच प्रशासकीय बदलीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. सध्या बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक असलेले प्रकाश वाघमारे यांना देखील पुढील प्रशासकीय बदली पर्यंत मुदतवाढ दिली आहे. खेड पोलिस ठाण्यातील पोलिस सहायक निरीक्षक राहुल लाड यांची लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पदी, तर लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात सध्या सहाय्यक निरीक्षक असलेले निलेश पांडुरंग माने यांची सायबर पोलिस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे.

इंदापूर पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक असलेले ज्ञानेश्वर धनवे यांची खेड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांची जेजुरी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. कामशेत पोलिस ठाण्यात सध्या नियुक्तीवर असलेले आकाश पवार यांची बारामती शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. इंदापूर पोलिस ठाण्यातील महेश माने यांची यवत पोलिस ठाण्यात तर लोणावळा शहर पोलिस ठाण्यातील संदेश बावकर यांची यवत पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

खेड विभागामध्ये वाचक असलेले सहाय्यक निरीक्षक दीपक कारंडे यांची आर्थिक गुन्हे शाखेत, तर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार यांची नारायणगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रणजीत पठारे यांची वेल्हा पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंचर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक किरण भालेकर यांची घोडेगाव पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून, बारामती शहर जिल्हा वाहतूक शाखेकडे असलेले सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातूरे यांची नियंत्रण कक्षात, तर यवत पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक निरीक्षक माधुरी तावरे यांची हवेली पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

बारामती शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक कुलदीप संकपाळ यांची पौड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक किशोर शेवते यांची लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात, सहाय्यक निरीक्षक सतीश पवार यांची शिक्रापूर पोलिस ठाण्यात, तर बालाजी भांगे यांची बारामती शहरच्या जिल्हा वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक अर्जुन मोहिते यांची दहशतवाद विरोधी पथकामध्ये तात्पुरता कार्यभार देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!