
Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): मॅफेड्रॉन (एमडी) 14,60,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ व देशी बनावटीचे पिस्टल राऊंडसह दोन संशयितांकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. विरोधी पथक ०२ व खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखेने फरासखाना भागात ही कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहा. पोलिस निरीक्षक नितीन कुमार नाईक तसेच अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार असे पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाणेच्या परीसरात २९/११/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत होते. डायमंड बिल्डींगचे खाली मारुती मंदिराजवळ शुक्रवार पेठ, पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी
1) बॉबी भागवत सुरवसे, वय २८ वर्षे, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा, पुणे.
2) तोसिम ऊफ लडडु रहिम खान, वय ३२ वर्षे, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ, पुणे यांच्या ताब्यातून एकुण १६,५७,०००/- रु. किंमतीचा ऐवज त्यामध्ये एकूण १४,६०,०००/- रु.कि.चा मॅफेड्रॉन (एम.डी.) असा अंमली पदार्थ व ६७,०००/- रु.कि.चे एक देशी बनावटीचे लोखंडी स्टील बॉडी असलेले पिस्टल, मॅगजीन एक व दोन जिवंत काडतुसे व इतर ऐवज जप्त केला आहे. त्यांच्या विरुध्द फरासखाना पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.२५२/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नितीनकुमार नाईक, अं.प.वि.प.२, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे सहा पोलिस आयुक्त, गुन्हे.२, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सपोफौ सुनिल पवार, पोलिस अंमलदार साहिल शेख, सुरेंद्र जगदाळे, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अझिम शेख, अमोल राऊत, पवन भोसले, निलम पाटील यांनी केली आहे.

पुणे शहरातील रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1ने केली अटक…
धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…
पुणे शहरातील फरासखाना तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी…
पुणे पोलिसांनी चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याच्या साथिदारांना हत्यारांसह केले जेरबंद…
पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…


