
ऑनर किलिंग! गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप…
नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या बापाला 20 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. बापाची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा 2013मध्ये गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यामागचा शोध घेऊन त्या खुनामागे जातपंचायतचा हात असल्याचे शोधून काढले होते. या खुनानंतर 2017 मध्ये महाराष्ट्र सरकाराने जातपंचायतच्या मनमानी विरोधात कायदा केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
आरोपी बापाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने ती कायम केली. आता सर्वोच्च न्यायालयाने पित्याची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
चोराला 10 बायका, 6 मैत्रिणी, 5 स्टार हॉटेलमधील वास्तव्य अन् विमानाने प्रवास…
विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…
पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…
Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…

