पाकिस्तान हादरला! पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार; शेकडो जखमी…
कराची (पाकिस्तान): बलुचिस्तान प्रांतामध्ये आज (शुक्रवार) आत्मघाती हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यासह 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर एका सुसाईड बॉंबरने हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बलुचिस्तानच्या मस्तुंगमधील अल फलाह रोडवर असलेल्या मदिना मशिदीजवळ हा स्फोट झाला. ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत भाग घेण्यासाठी अनेक नागरिक जमले असताना हा प्रकार घडला. स्फोटात एका पोलिस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.’
बलुचिस्तानचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, ‘एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आले आहे. गंभीर जखमींना क्वेट्टा येथे नेण्यात येत असून, परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आमच्या शत्रूंना परकीय मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे. अशा प्रकारच्या स्फोटांच्या मागे जे कोणी आहेत त्यांना सोडणार नाही.’
BREAKING: Police and a government official in Pakistan say a powerful bomb has exploded near a mosque at a rally celebrating the birthday of Islam’s Prophet Muhammad, killing at least 21 people and wounding more than 50 others. https://t.co/1qqoZ7z71N
— The Associated Press (@AP) September 29, 2023
पाकिस्तानचे गृहमंत्री सर्फराज अहमद बुगती यांनी या स्फोटात प्राण गमावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि स्फोटाचा निषेध केला आहे. बुगती म्हणाले की, दहशतवाद्यांचा कोणताही धर्म किंवा श्रद्धा नसून बचाव मोहिमेदरम्यान सर्व संसाधनांचा वापर केला जात आहे. जखमींवर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. दहशतवादी घटक कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत.’
पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीने बलात्कार करणाऱ्या बापाला जागेवरच संपवलं…
Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!
पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…
पाकिस्तानमध्ये जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; ३५ ठार…