महिलेवर अंत्यसंस्कारही झाले पण ‘लाडली बहीण योजने’चा लाभ घेताना सापडली…
भोपाळ (मध्य प्रदेश): बेपत्ता झालेल्या महिलेचा तपास करताना पोलिसांना एका महिलेचा जळलेला मृतदेह सापडला होता. तो मृतदेह त्याच बेपत्ता महिलेचा असल्याचे समजून त्यावर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, ‘लाडली बहीण योजने’चा लाभ घेताना महिला नोएडामध्ये पकडली गेली आहे.
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातल्या मेहगावमध्ये राहणाऱ्या सुनील शर्मा यांची पत्नी ज्योती शर्मा घरातून गायब झाली. सुनील यांनी पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, आढळून न आल्यामुळे मेहगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन दिवसांनी चार मे रोजी कतरौल गावाच्या जवळच्या शेतात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी ज्योतीच्या माहेरच्या व सासरच्या लोकांना बोलावून घेतले होते. पण, मृतदेह ज्योतीचा नसल्याचे पती सुनील शर्मा यांचे म्हणणं होते. तर माहेरचे लोक मात्र ती ज्योतीच असल्याचे म्हणत होते. माहेरच्या लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी तो ज्योतीचा मृतदेह समजून पुढची कारवाई सुरू केली. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
ज्योतीच्या माहेरच्यांनी सुनीलवर अनेक आरोप केले. त्यामुळे पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले होते. पत्नीला आपण मारलं नसल्याचे सुनीलचे म्हणणे होते. दरम्यान, काही दिवसांनी सुनील बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. तेव्हा ज्योतीच्या खात्यातून 2700 रुपयांचा व्यवहार झाल्याचे त्याला समजले. मध्य प्रदेशातल्या लाडली बहना योजनेअंतर्गत मिळणारे पैसे अंगठ्याचा ठसा देऊन एका कियॉस्क सेंटरवर काढण्यात आले होते. ते सेंटर दिल्लीच्या जवळच्या उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुनील पोलिसांसह नोएडामध्ये गेला, तेव्हा फुटपाथवर तुटलेली चप्पल शिवताना ज्योती दिसली.
ज्योतीला पकडून पोलिसांनी मेहगावला आणले. न्यायालयात नेल्यानंतर ज्योतीला माहेरच्यांकडे सोपवण्यात आले. 53 दिवसांनी ज्योतीचा शोध लागला; मात्र त्या वेळी जळलेल्या अवस्थेत सापडलेली महिला कोण होती, याचे गूढ पोलिसांना उकललेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबल आणि पतीची बदली…
हाथरस चेंगराचेंगरी! सत्संगवाला भोले बाबाच्या वहिनीने केला खुलासा…
मंत्र्याच्या पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली…
आई आणि भावाच्या हत्येचा उलडगा; काजल निघाली समलैंगिक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…