पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

पुणे : एका महिलेने शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला आहे. या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून ३० वर्षीय महिलेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि आरोपी महिलेची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर, महिलेने फिर्यादी यांना वारंवार फोन करून भेटण्यासाठी बोलवून घेतले. फिर्यादी भेटण्यास गेला नाही तर त्यांच्यातील शारीरिक संबंधांची माहिती त्यांच्या घरच्यांना देईन, अशी धमकी दिली. शिवाय, गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वारंवार पैसे घेतले.

महिलेने प्रकरण मिटवायचे असेल तर एकरकमी २० लाख रुपये दे, अशी मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर कायदेशीर कारवाई करून नोकरी घालविण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…

पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!