
पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…
पुणे : पुणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ३० लाखांच्या लाचेच्या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. वैशाली तोटेवार यांना पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. तोटेवार यांची पदोन्नतीने मुंबई लोहमार्ग पोलिस दलात पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. बदलीनंतर त्यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतून कार्यमुक्त करण्यात आले होते.
वैशाली तोटेवार यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश रद्द करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक पदावरुन त्यांना निलंबित करण्यात येणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली. तोटेवार या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्तीस होत्या. जमिनीच्या एका प्रकणातील तक्रार अर्ज त्यांच्याकडे चौकशीसाठी सोपविण्यात आला होता. या प्रकरणात तोटेवार यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने सुरुवातीला दोन लाख रुपये दिले होते. उर्वरित २८ लाख रुपयांची लाच देण्याची मागणी त्यांनी केली होती.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला शनिवारी (ता. २ मे) दुपारी बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलजवळ बोलाविले होते. ही रक्कम स्वीकारण्यासाठी तोटेवार यांनी संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७, रा. चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ ) यांना पाठविले होते. चव्हाण हा तोटेवार यांच्या ओळखीचा आहे. तक्रारदाराकडून लाच घेताना चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. चौकशीत तोटेवार यांनी लाच घेण्यासाठी पाठविल्याचे उघड झाल्यानंतर तोटेवार यांच्यासह चव्हाण याला अटक करण्यात आली. तोटेवार आणि चव्हाण यांना न्यायालायने सहा मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, कारवाईच्या आदल्या दिवशीच तोटेवार यांची पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती आणि त्यांची मुंबई येथे बदलीही करण्यात आली होती. पुणे पोलिस दलातून त्यांना कार्यमुक्तदेखील करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्या लाचखोरी प्रकरणात अडकल्या. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावरील निलंबनासोबतच कार्यमुक्तीचा आदेशही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलिस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून ACB कडून पुढील तपास सुरू आहे.
पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…
वादग्रस्त वक्तव्य! पुणे शहरातील कॉलेजचा प्राध्यापक निलंबित; गुन्हा दाखल…
पुणे! ‘रील स्टार’ महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलिस दलात खळबळ…
पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…

