बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…

पुणे : बारामतीच्या माळेगावातील कृषी विज्ञान केंद्राच्या स्वच्छतागृहामध्ये नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्यानंतर माळेगाव पोलिस ठाण्यात कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्याद दिली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचारी वर्गाच्या लक्षात ही घटना आली. त्यानंतर तात्काळी पोलिसांनी याबाबत कळवण्यात आले. आषाढी एकादशीच्या दिवशी ही घटना उघडकीस आली.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहात नवजात स्त्रीजातीचं अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. अर्भकाचा जन्म झाल्याचे लपवून ठेवून बालकाची देखभाल न करता त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देश मनात ठेवूनच हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. तसेच, निर्दयी व्यक्तीने नवजात अर्भकाला उघड्यावर टाकून दिल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीवरुन माळेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मृत नवजात स्री जातीचे अर्भक अनैतिक संबंधातून तर जन्माला आले असावे किंवा मुलगी नको म्हणून मृत अवस्थेत ते उघड्यावर टाकले असावे. आरोपी अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येईल.

सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले अर्भक…

निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…

निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!