संतापजनक! चिमुकलीची हत्या करून मृतदेह कोंबला प्लॅस्टिकच्या बादलीत…

भिवंडी : सहा वर्षीय चिमुकलीची हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार झाला. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी शहरातील फेणेगाव परिसरातील धापसीपाडा येथील एका पत्र्याच्या चाळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिमुकलीचे आई-वडील हे दोघेही एका गोदामामध्ये काम करण्यासाठी जातात. 13 सप्टेंबर रोजी आई-वडील कामासाठी निघून गेले होते. हत्या झालेल्या सहा वर्षीय मुलीसोबत तिचा नऊ वर्षाचा भाऊ घरी होता. चिमुकली सकाळपासूनच बेपत्ता होती. सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची सांगितल्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेतला. कुठेही न मिळाल्यामुळे रात्री उशिरा भिवंडी शहर पोलिस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरवात केली,

पोलिसांनी शोध मोहि सुरू केली होती. शुक्रवारी (ता. १५) दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोध घेतला असता एका बंद असलेल्या चाळीतील खोली मध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात रवाना केला. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदन अहवालामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्यानुसार गुन्ह्याची व्याप्ती वाढवली जाईल असे सांगत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना केली आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!