
पीएमओ सचिव म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर सत्कार करून घेतला अन् अडकला…
छत्रपती संभाजीनगर: तिसगाव येथे एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. याच विवाह सोहळ्यात एक व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसमोर आपला सत्कारही करून घेतला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी केली आणि तो अडकला.
पीएमओ सचिव म्हणून तोतयागिरी करणाऱ्यासह त्याच्या बॉडीगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक भारत ठोंबरे (रा. दिल्ली मूळ उंदरी तालुका केज जिल्हा बीड) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. विकास प्रकाश पांडागळे (रा.पुणे) असे बॉडीगार्ड म्हणून मदत करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांकडून आता या दोघांची चौकशी सुरु आहे. त्याच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी आणि इंग्रजी पाटी, राष्ट्रध्वज आढळून आला आहे. यापूर्वी त्यांनी पीएमओ कार्यालयाचे सचिव असल्याचे भासवून कोणाला गंडा घातला आहे का, याची तपासणी केली जात आहे.
तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं…
तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…
लखोबा लोखंडे! विधवा महिलेशी लग्न अन् सोनं, चांदी पैसे घेऊन पळाला…

