नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक: कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत असून, महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या व्हिडिओंमधून ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सखोल तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुमारे दीड तास आढावा बैठक घेतली. या SIT मध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 12 हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन खरात याने महिला अत्याचार केल्याचे 100 हुन अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिसांनी कॅप्टन खरातच्या विविध ठिकाणी छापेमारी करत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. झाडाझडतीदरम्यान दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. जरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी या घडामोडींमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, न्यायालयाने खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान खरातने अंकशास्त्र आणि भविष्यकथनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध निर्माण करून मोठी संपत्ती उभी केल्याचेही समोर आले आहे. नाशिकमध्ये आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, तसेच पाथर्डी परिसरातील सुमारे 30 एकर जमीन आणि इतर ठिकाणी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!