हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…

अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुन्या खाणीतील खोल पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ–बहिणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सार्थक गणपत बडे आणि सुरेखा गणपत बडे (दोघेही, रा. डाऊच खुर्द) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरासह कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

डाऊच खुर्द येथील गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. शनिवारी त्यांची मुले सार्थक आणि सुरेखा हे दोघे चांदेकसारे परिसरातील जुन्या खाणीजवळ मेंढ्या चारत होते. मेंढ्या पाणी पिण्यासाठी खाणीच्या कडेला गेल्या असता, त्यापैकी एक मेंढी पाण्यात घसरून पडली. मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली; परंतु, पाय घसरल्याने ती स्वतःच खोल पाण्यात बुडू लागली. बहिणीला बुडताना पाहताच भाऊ सार्थक पळत आला आणि तिला वाचवण्यासाठी खाणीत उडी घेतली. मात्र पाण्याची खोली, खाणीत जमा झालेली दलदल आणि भीती यामुळे दोघेही बाहेर येऊ न शकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

खाणीजवळ कपडे धुण्यासाठी थांबलेल्या काही महिलांनी हा प्रकार पाहताच आरडाओरड केली. युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर डाऊच खुर्द येथे शोकाकुल वातावरणात दोघांचा अंत्यविधी पार पडला. या घटनेमुळे गणपत बडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हृदयद्रावक! आईची दोन्ही चिमुकल्यांना घेऊन मारली विहिरीत उडी…

Video! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून मारहाण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

नागपूर! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह…

सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!