भारती विद्यापीठ पोलिसांनी खून करून पसार झालेल्या आरोपीस शिताफीने पकडले…

पुणे (संदिप कद्रे): जमिनीच्या वादातून खुन करुन पसार झालेल्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने पकडले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कात्रज ते नवले बीजकडे जाणारे रोडवर दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवेलगत, आंबेगाव बुद्रुक पुणे येथे दोन अनोळखी व्यक्तींनी ०५/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजणेच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांचे वडील विलास जयवंत बांदल (वय ५५) यांचे डोक्यात, तोंडावर दगड व वीट घालुन त्यांना जिवे ठार मारले म्हणून फिर्यादी अभिषेक विलास बांदल (वय २४ वर्षे, धंदा शिक्षण, रा. त्रिमुर्ती रेसीडेन्सी, फ्लॅट नंबर २४, वंडरसिटी जवळ, कात्रज पुणे मुळ गाव मु. पो. पिसावरे, ता. भोर, जि. पुणे) यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८० / २०२४, भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, सचिन गाडे यांनी घटनास्थळ ते दत्तनगर, तसेच कात्रज हायवेवरील सर्व आस्थापनांचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करुन तसेच गोपनीय बातमीदारामार्फतीने माहिती घेतली. नमुद गुन्हयातील मयत विलास जयवंत बांदल यास त्याचा मित्र संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर (वय ४५ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) याने जमीनीच्या वादातुन जिवे ठार मारले आहे.

सदर आरोपी कोणताही मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे आरोपीस पकडण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आरोपीस पकडण्यासाठी वरीष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करुन शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे नमुद आरोपीचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपी हा रावडी (ता. भोर, जि. पुणे) या गावात त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम, सचिन गाडे यांनी रावडी (ता. भोर, जि. पुणे) येथे जावून शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रविण पवार, सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, नंदीनी वग्याणी, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या बंटी बबलीचा केला पर्दाफाश…

भारती विद्यापीठ पोलिसांनी महागडा लॅपटॉप चोरी करणाऱ्यास केली अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!