इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

अहिल्यानगर: प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे सोनं चोरीला गेल्याने लग्नसोहळ्यास गालबोट लागले. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंगचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी दोन भामट्यांना अटक केली आहे.

संगमनेर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात आरोपी चोरट्यांनी लग्नातील पाहुण्यांचे 60 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. आरोपी सागर कांबळे आणि बबलू उर्फ अब्दुल पिंजारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आतिक उर्फ आरीफ शेख, सनी ढोकणे हे दोघे फरार आहेत. पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू आहे. शहरातील ममदापूर फाट्याजवळ सापळा रचून अटक केली. पोलिसांनी 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये, जप्तीत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल यांच्याशी झाला. या शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश…

नगर हादरलं! कीर्तनकार महाराजकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकरी संप्रदायला काळिमा…

भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!