कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…

मंगळुरु (कर्नाटक): एका भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या युवतींना चिरडले असून, या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अंगावर काटा आणणारा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फूटपाथवरून चालणाऱ्या पाच महिलांना भरधाव कारने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. मंगळुरुच्या लेडी हिल येथे फूटपाथवरून चालत असलेल्या पाच महिलांना मागून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. यानंतर कार न थांबता तिथून लगेच निघून गेली. या घटनेत रूपश्री (वय 23) नावाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. स्वाती (वय 26), हितानवी (वय 16), कार्तिका (वय 16) आणि याथिका (वय 12) या मुली जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सिटीझन मूव्हमेंट ईस्ट बेंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेत चालकाचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. अपघातानंतर कार चालकाने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आहे. या अपघातप्रकरणी पांडेश्वर पोलिस ठाण्यात कमलेश बलदेव या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!