युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर संशयित आरोपीने देखील जीवन संपवले आहे. चार दिवसांपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने लघूशंका करण्याचा बहाणा करत पलायन केले होते. गुरुवारी गंगापूर रोडवरील विसे मळा भागात ही घटना घडली होती. हा आरोपी पळून गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. पण, संशयित हाती लागला नाही. त्यानंतर संशयित आरोपीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे.

पिंपळनारे (ता. दिंडोरी) येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. यानंतर पीडित मुलीने आत्महत्या केली होती. या घटनेच्या दोन दिवसानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या संशयित आरोपीचा मृतदेह विहरित आढळून आला आहे. पण, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कॉन्स्टेबल यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलिसांनी संशयित उमेश खांदवे यास अटक केली होती. मात्र, संशयिताने लघुशंकेचा बहाणा करत पोलिसांच्या हाताला झटका देत पळून गेला होता.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार पिंपळणारे येथील उमेश खांदवे (वय 35) या संशयितास दिंडोरी पोलिसांनी बलात्काराच्या गुन्हात अटक केली होती. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली. संशयिताने पीडित युवतीला त्र्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी परिसरात आणून बलात्कार केला होता. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, गुन्ह्याच्या अधिक तपासाठी दिंडोरी पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यानी त्यास गुरुवारी (ता. 28) त्र्यंबकेश्वर परिसरात नेले होते. तेथून ते परतीच्या प्रवासाला निघाले असता ही घटना घडली. सर्व जण शासकीय वाहनाने गंगापूर रोडवरील विसे मळा भागातून प्रवास करीत असताना संशयिताने लघूशंकेचा बहाणा केला. त्यानंतर एक पोलिस व संशयित रोडच्या दुसर्‍या बाजूला दुभाजक ओलांडून गेले. ही संधी साधत आरोपीने पोलिसाच्या हाताला झटका देवून पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो अंधाराचा फायद घेत पळून जाण्यात यशस्वी झाला होता. यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…

डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…

प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!