सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना केली अटक…

पुणे (सुनिल सांबारे): सांगवी पोलिस स्टेशन येथील खुनाचे गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात तपास पथकाला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

न्यु सिध्देश्वर फॅमिली पान शॉप समोर, इंद्रप्रस्थ सोसायटी, माहेश्वरी चौक, नवी सांगवी, पुणे येथे २९/०५/२०२४ रोजी रात्रौ ०९/४५ वा. चे सुमारास अमन गिल व त्याचे इतर साथीदारांनी मोटार सायकलवरुन येवुन त्यांचेकडील बंदुकीतून दिपक दत्तात्रय कदम (रा. आशिर्वाद बिल्डींगचे शेजारी, जयमाला नगर लेन नं.०२, जुनी सांगवी, पुणे) याच्यावर गोळया झाडून त्याचा खुन केला. सदर घटनेबाबत सांगवी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. २३८ / २०२४ भा.दं.वि. कलम ३०२, ३४, आर्म अॅक्ट कलम ३(२५)(२७), महा. पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध सांगवी पोलिस स्टेशनचे पोलिस घेत होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी अमन राजेंद्र गिल (वय – १८ वर्षे, रा. नवी सांगवी, पुणे) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याचा दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास ३०/०५/२०२४ रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपी अमन राजेंद्र गिल याचेकडे सखोल तपास करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी
१) सुजल राजेंद्र गिल, वय- १९ वर्षे, रा. नवी सांगवी, पुणे,
२) सौरभ गोकुळ घुटे, वय- २२ वर्षे, रा. जुनी सांगवी, पुणे यांना औध परिसरातुन ताब्यात घेतले आहे. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने ३१/०५/२०२४ रोजी त्यांना गुन्ह्यात अटक केली. सुमारे २० दिवसापुर्वी मृतक दिपक कदम याने आरोपी सुजल गील व अमन गील यास धमकावलेले होते. त्या पुर्व वैमनस्यातुन व सुडाच्या भावनेतून आरोपींनी दिपक कदम याचा खुन केल्याचे तपासादरम्यान कबुल केले आहे. सदर आरोपीकडे सखोल तपास करुन दाखल गुन्ह्यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. याबाबत पोलिस तपास करत आहे. न्यायालयाने आरोपी अमन राजेंद्र गिल ०४/०५/२०२४ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केलेला आहे. तसेच इतर दोन आरोपीस उद्या मा. कोर्टात रिमांड कामी हजर केले जाणार आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

सदरची कामगिरी विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, संदिप डोईफोडे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे, विशाल गायकवाड, पोलिस उप आयुक्त, वाहतुक शाखा (अति. कार्यभार परि – १ ), सचिन हिरे, सहा. पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे वपोनि. श्री. महेश बनसोडे, सहा. पोलिस निरीक्षक तानाजी भोगम, पोउनि चक्रधर ताकभाते, पोउनि किरण कणसे, पोलिस अंमलदार पो.हवा ७३९ / प्रकाश शिंदे, ११९४/विवेक गायकवाड, १५३५/ विजय मोरे, १५१२ / प्रमोद गोडे, ९४८ / विनोद साळवे, १०९३ / राजेंद्र शिरसाट, ८८२/नितीन काळे, १६८० / विनायक डोळस, पो.ना. १५३४ / प्रविण पाटील, पो.अनं. २२१८ / आकाश खंडागळे, २०११/विजय पाटील, ३२८० / निलेश शिंगोटे, ३३१४/ राजाराम माने, २२०९/ सुहास डंगारे यांनी केली.

पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन मुलाची कबुली…

भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; १६ मोटारसायकल हस्तगत…

पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली कार…

पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिकाने झाडल्या व्यवसायिकावरच गोळ्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!