सांगलीत थरार! दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने चिरला गळा…

सांगली: सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोड परिसरात एका टोळीने रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पाठलाग करून कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. हल्ला इतका भयंकर होता की संबंधित गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला. एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा अशाप्रकारे दिवसाढवळ्या खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सौरभ बापू कांबळे (वय २४) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो सांगली शहरातील जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिकी आवासमधील रहिवासी होता. मृत सौरभ याचा भाऊ देखील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या तो कळंबा कारागृहात शिक्षा आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या एका वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली असून तेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे.

सौरभ कांबळे हा वाल्मिकी आवास परिसरात भावासोबत राहत होता. त्याच्यावर मारामारीसह दोन गुन्हे दाखल आहेत. संशयित हल्लेखोर आणि सौरभ यांच्यात आठ दिवसापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग संशयितांच्या मनात होता. सौरभ आणि त्याचे काही मित्र वाल्मिकी आवासमध्ये शनिवारी दुपारी थांबले होते. यावेळी मागील बाजूच्या शेतातून संशयित हल्लेखोर त्याच्या दिशेने आले. हल्लेखोर येत असल्याचे पाहून सौरभने मित्रांना बाजूला पाठविले. त्याचे मित्र जाताच संशयितांची सौरभ याच्याशी वादावादी झाली. त्यानंतर सौरभ तेथून बिल्डिंग क्रमांक सात येथे पळत आला. संशयितांनी त्याला गाठून कोयता आणि दगडाने मारहाण केली. कोयत्याचा वार गळ्यावर वर्मी बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…

सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार…

सांगली जिल्ह्यात टोळक्याने केली मध्यरात्रीच्या सुमारास पहिलवानाची निर्घृण हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!