भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…

पणजी: गोव्यातील भाजपमधील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देऊन त्यांच्या सेवेत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गौरव बक्षीवर आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

गोव्याचे पशूपालन मंत्री हळर्णकर हे रेवाडा पंचायतीमध्ये आयोजित रोपवाटप कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी आपली गाडी पंचायत कार्यालयाजवळील रस्त्यावर पार्क केली होती. या गाडीसमोर गौरव बक्षी यानेदेखील गाडी पार्क केली होती. मंत्री हळर्णकर यांच्या वाहन चालकाने गौरव बक्षी याला त्याची गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद सुरू असताना मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गौरवने थेट त्यांच्या अंगावर धावून गेला आणि शिवीगाळ करत धमकी दिली. त्याशिवाय, त्या ठिकाणी हळर्णकर यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना देखील गौरवने धक्काबुक्की केली.

अभिनेता गौरव बक्षी विरोधात बुधवारी रात्री तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोलवाळ पोलिसांनी अभिनेता गौरवला अटक केली. दरम्यान, गौरव बक्षी याने ‘बॉम्बे बेगम्स’, ‘नक्सलबाडी’ यासह काही चित्रपटांमध्ये काम केले असून गोव्यात एक स्टार्ट-अप चालवत आहे.

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…

प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…

अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून घेतले ताब्यात…

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!