नवविवाहित युवक आणि युवतीच्या पायाला साखळी अन् कुलुप; नदीत दोघांचे मृतदेह…

धुळे : धुळे जिल्ह्यातील तापी नदीत युवती आणि युवकाचे पाय एकमेकांना साखळीने बांधलेले आणि त्याला कुलूप लावले होते. दोघांनीही एकत्र मृत्यूला कवटाळल्याचा अंदाज आहे. मात्र, त्याआधी युवकाने पत्नीच्या भावाला मध्यरात्री फोन करुन चार शब्दात आपली व्यथा व्यक्त केली होती, अशी माहिती मिळत आहे.

श्याम पाटील (वय ३५) आणि त्यांची पत्नी सपना पाटील (वय १९) अशी मृतांची ओळख पटली आहे. ते मूळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसे गावचे रहिवासी होते. प्राथमिक तपासानंतर नरडाणा पोलिसांना हे आत्महत्येचे प्रकरण असावे, असा संशय आहे. मात्र त्यांच्यासोबत घातपात झाला आहे का, याची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तापी नदीत दोन मृतदेह तरंगताना पाहून काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना असे आढळून आले की, त्या पुरुषाचा एक पाय आणि महिलेचा एक पाय साखळीने एकमेकांना बांधलेले असून त्यावर कुलूप लावले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

एपीआय सचिन कापडणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामच्या मेहुण्याने सांगितले की, “बुधवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास श्यामने मला फोन केला होता आणि ‘सर्व काही संपले आहे’ असे म्हटले होते. श्यामने फोन बंद करण्यापूर्वी मेहुण्याला सांगितले की तो निघून जात आहे. त्यानंतर वारंवार फोन करुनही श्यामच्या मेहुण्याला त्याच्याशी संपर्क साधता आला नाही,” असे कापडणीस म्हणाले. त्या फोन कॉलनंतर काही वेळातच हे जोडपे पाण्यात बुडाले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.

दरम्यान, जळगावमधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या श्यामचे सपनासोबत सुमारे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे त्याचे दुसरे लग्न होते. या जोडप्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, त्यामागच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.

धक्कादायक! पत्नीचे नको त्या अवस्थेतील फोटो पाहून नवरा हादरला…

मंत्रालयातील उच्च पदावरील महिला अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; मला तुझ्याशी लग्न करायचंय…

नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

बीड! प्रेमाच्या त्रिकोण अन् आईच्या प्रियकरावर गोळीबार…

नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!