पुणे शहरात एसटी बसची दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक…

पुणे : पुणे शहरातील फातीमानगर भागात एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एसटी बसचालकला ताब्यात घेतले आहे.

एसटी बस सांगोला येथून स्वारगेट एसटी स्टँडकडे येत होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. वानवडी पोलिसांनी एसटी चालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, हडपसर रस्त्यावर कायमच वर्दळ असत. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. मंगळवारी (ता. २१) रात्री या मार्गावर रामटेकडी येथे मोठा अपघात झाला. सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात अपघात झाला बसमध्ये अपघाताच्या वेळी 30 प्रवासी यावेळी होते. ब्रेक न लागल्याने बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात काही कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर चार ते पाच नागरीक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…

पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!