आमदारपुत्राची दादागिरी; बंदुकीच्या धाकाने व्यावसायिकाचे अपहरण…

मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्याविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार व्यावसायिकाने केली आहे. खोट्या मनिलाँड्रिंग केसमध्ये गोवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज याच्या सह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वनराई पोलीसांनी या प्रकरणात मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी व इतर 10 ते 12 अनोळखीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईतील गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन या कार्यालयात बुधवारी (ता. ९) दुपारी गोंधळ घालून, त्यावेळी 10 ते 15 जणांनी कार्यालयात येऊन फिर्यादी व सीईओ राजकुमार सिंग यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले असा आरोप आहे. राजकुमार सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले कि, मनोज मिश्रा याच्या बरोबर केलेला 5 वर्षाचा करारनामा प्रमाणे पैसे परत न करता कलेला करारनामा जबरदस्तीने रद्द करण्याकरिता शिवगळी व मारहाण करण्यात आली. त्यानंतर सिंग याला कार्यालयातून खेचून कारमध्ये बसून प्रकाश सुर्वे यांच्या युनिवर्सल हायस्कुल जवळ, दहिसर पूर्व मुंबई या कार्यालयात आणले. जबरदस्तीने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा याच्या सोबत केलेला करारनामा रद्द झाला असे लिहून घेतले. मात्र नंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांपासून सुटका केली.

पीडित राजकुमारचे वकील सदानंद शेट्टी यांनी माहिती दिली कि, हे संपूर्ण प्रकरण साडेआठ कोटी रुपयांचे आहे, जे राजकुमार सिंग यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक व आरोपी मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी दिले होते. या प्रकरणी पीडित राजकुमार सिंगच्या वतीने वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह इतर जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलिसांनी या प्रकरणात भा द वि कलम 364-A, ४५२, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ आणि ५०६ व 3, 25 शस्त्रास्त्र आधीनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!