नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून; पण…

नाशिक : नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून दिला होता. पण, आठवडा होत आला तरी नवरा घरी परत न आल्याने नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. संबंधित महिलेच्या नवऱ्याचा खून झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून, ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांच्याच मित्रांनीच पार्टीच्या दिवशी खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जेलरोड भागातील पंचक गावातील ज्ञानेश्वर गायकवाड हा युवक 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्रा सोबत पार्टी करण्यासाठी घरून जेवण बनवून दुचाकीवर गेला होता. मात्र, तो पुन्हा घरी आला नाही. याबाबत पत्नी, वडील व शेजारी यांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दिली होती. दरम्यान, सोमवारी गावातील सोमनाथ बोराडे हे आपल्या गायी-म्हशी घेऊन पंचक येथील गोदावरी नदी किनारी गेले होते. त्यांना उग्र वास येऊ लागल्याने गावकऱ्यांच्या मदत घेतली. त्यांनी नाशिक रोड पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या छातीवर खोलवर जखमा दिसून आले. चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले. मृतदेह सात ते आठ दिवसांपासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड हा कधी मोजमजुरी तर कधी भांडे विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या मागे वडील, पत्नी, एक लहान मूल आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

Video: ‘मुळशी पॅटर्न’चा थरारानंतर पोलिसांनी काढली गुंडांची धिंड…

इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…

मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!