मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (वय ८२) यांचे प्रदीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या त्या मातोश्री होत. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज (गुरुवार) दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास होता. अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचे निधन झाले. चार वर्षांपूर्वी सीमा देव यांना अल्झायमर झाल्याची माहिती अजिंक्य देव यांनी दिली होती. सध्या त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. सीमा देव यांनी सरस्वतीचंद्र, आनंद, ड्रीम गर्ल या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते.
१९५७ मध्ये आलिया भोगासी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. लग्नाआधीचं नाव नलिनी सराफ असे होते. रमेश देव यांच्याशी लग्नानंतर त्यांचे नाव सीमा देव झाले. ८० हून जास्त चित्रपटांमध्ये सीमा देव यांनी अभिनय केला होता. अनेक आनंद, जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…
धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…