
पुणे! आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये टॉप काढण्यास सांगून धमकावणारे अटकेत…
पुणे (संदिप कद्रे): आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये जावून त्यांचेकडुन आयुर्वेदिक उपचार करुन घेताना तेथील कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सदरचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांच्याकडून खंडणी गोळा करणारे व गल्यातील पैशांची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याईनगर क्लासीक हाईटस तीसरा मजला, धनवकडी पुणे येथे नोकरीस असताना ०३/०२/२०२५ रोजी दुपारी १३.०० वा. चे सुमारास दोघेजण आयुर्वेदिक उपचार केंद्रात येवुन त्यांनी आयुर्वेदिक उपचाराची माहिती विचारली असता मी त्यांना माहिती देवुन उपचारासाठी साठी कोणते तेल वापरायाचे आहे असे विचारले असता त्यांनी तीळाचे तेल वापरण्यास सांगितले. त्या कस्टमरने मला १ तास उपचार घ्यावयाचा आहे असे सांगितल्याने त्यावेळी त्याने त्याचे नाव रोहित वाघमारे असे असल्याचे सांगितले. उपचारा दरम्यान त्याने माझे अंगावरील टॉप धमकावून काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तु जर मी सांगेल तसे उपचार केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन असे सांगून जबदरस्तीने उपचार करुन घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३ जण रोहित वाघमारे याचे सोबत आले व आम्हाला २०,०००/- रुपये दे नाहितर तुझा उपचार करीत असताना न कळत काढलेला व्हिडीओ दाखवून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावेळी आमचेकडे पैसे नसल्याने कांऊटरमध्ये ठेवलेले ८००/- रुपये जबदरस्तीने घेवुन गेले त्याबाबत सदर इसमाविरूध्द दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सहकारनगर पोलिस स्टेशन गु.र.नं. ९४ / २०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०८ (२), ३०९ (४),७४,७९, ११५ (२), ३५२,३५१(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील पोलिस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलिस अंमलदार असे तपास करीत असताना तांत्रीक विष्लेशन करुन, संशयीत आरोपींचे ठाव ठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करुन, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन येथील पोलिस स्टाफचे मदतीने आरोपीतांना ताब्यात घेतले.
१) रोहीत गुरुदत्त वाघमारे वय २९ वर्षे मुळ रा. यशोदीप चौक चौधरी बिल्डींग वारजे माळवाडी पुणे सध्या रा. पंचशिल तरुण मंडळ भिमनगर सी बिल्डींग ७ वा मजला खिरीड यांचे भाडेकरी उत्तमनगर पुणे
२) शुभम चांगदेव धनवटे वय २० वर्ष रा. गणराजज कॉम्प्लेक्स फ्लॅट नं.१०९ दुसरा मजला आहिरे गेट उत्तम नगर पुणे ३) राहुल ज्ञानेश्वर वाघमारे वय ३६ वर्ष रा. स.नं.४४ एसआरए बिल्डींग मामासाहेब मोहळ शाळेसमोर केळेवाडी पौड रोड कोथरुड पुणे असे सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांना दाखल गुन्हा केल्याची कबुली देवुन सदरचा प्रकार पुणे शहरातील वेगवेगळया ७ ते ८ ठिकाणी केला असल्याचे देखील सांगितले आहे.
अटक आरोपींकडे अधिक तपास करीता यातील आरोपी क्रमांक १) रोहित वाघमारे याचे विरुध्द वारजे पोलिस ठाणे गु. रजि.नं. ५०७/२०२१ भांदवी ३५४ अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी रोहित वाघमारे व आरोपी शुभम चांगदेव धनवटे याचे विरुध्द अंभोरा पोलिस स्टेशन बीड गु. रजि.नं. २०८/२०२४ भा.न्या. संहिता ३०४(४) अन्वये दाखल आहे. तसेच पाथर्डी पो.स्टे. जि. अहमदनगर गु. रजि.नं. ८५०/२०२४ भा.न्या. सं. ३०९ (६) अन्वये दाखल असुन सदर गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे.
सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे सहा.पोलिस निरीक्षक सागर पाटील, सहा.पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, निखील राजीवडे, प्रदिप रेणुसे, आकाश किर्तीकर, महेश भगत, अमित पदमाळे, योगेश ढोले, खंडू शिंदे यांनी केली आहे.
पुणे शहर परिसरात वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग कोणते…
पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…
पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
पुणे! इंजिनिअर युवकाने अभिनेत्रीकडे पाहून केले हस्तमैथुन…
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…

