
सांगली हादरली! निर्दयी बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं, लेकीनं पाणी-पाणी म्हणत सोडला जीव…
सांगली: बापानेच चोरीच्या संशयावरून दोन मुलींना रात्रभर हात-पाय बांधून उलटे टागंले. यामध्ये 10 वर्षीय सानिकाने ‘पाणी, पाणी’ म्हणत जीव सोडला. तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घटना घडली असून, नाना हैबत यमगर असे निर्दयी बापाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नाना हैबत यमगर याने शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांना बापाने रात्रभर उलटे टांगले. यावेळी नातींना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या आजोबावरही आरोपीने हल्ला केला होता.
बुधवारी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत ‘पाणी, पाणी’ म्हणून ओरडत होत्या. मात्र, त्यांच्याच आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. मुलींना घराच्या छताला बांधून निष्ठुर आई-वडील घरातच निर्धास्त झोपले होते. तर बाहेर आजी-आजोबा झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला. गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजता मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत सानिकाला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे ती मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईकांनी सानिकाचा मृतदेह घरी आणला.
दरम्यान, ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबीयांनी मृत सानिकाचे अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार सांगितला. “आम्हाला वडिलांनी हात-पाय बांधून उलटे टांगले आणि मारहाण केली, असे तिने सांगितल्याने डॉक्टरांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.
सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, संबंधित आरोपींवर खून व खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सांगली! पोलिसांनी रेल्वे तिकिटावरून अन् चिक्कीवरून लावला नीतूच्या खुनाचा छडा…
सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…
सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार! राजकीय नेत्याची वाढदिवशीच भर स्टेजवरच हत्या…
सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! बापाने तीन दिवसांच्या लेकीचा घेतला जीव…

