मोक्का ९९! वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’…

पुणे (संदीप कद्रे) : लोणी काळभोर परिसरात हातातून मोबाईल घेतल्याच्या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९९ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

वैभव उर्फ गोट्या राजाराम तरंगे (वय 20 रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), सागर अरुण सिन्हा (वय 19 रा. उरुळी कांचन), यश लोणारी (रा. तुपे वस्ती, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 324, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलिस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन तरंगे व सिन्हा यांना अटक केली आहे. याबाबत 25 वर्षीय युवकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील दत्तवाडी येथे घडली होती.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी परिमंडळ- 5 पोलिस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

संबंधित कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त आर राजा, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलिस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, शिवशांत खोसे तपास पथकाचे पोलिस अंमलदार तेज भोसले, संदीप घनवटे, आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ९९वी कारवाई आहे.

मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’

मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…

मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…

मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…

मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!