
शिक्षक दांपत्याचा अभियंता मुलगा अन् चोरायचा महिलांची अंतवस्त्रे…
बंगळुरू (कर्नाटक) : शिक्षक दांपत्याचा अभियंता मुलगा आणि महिलांची अंतवस्त्रे चोरायचा. महिलांचे अंडरवेअर चोरणाऱ्या या इंजिनीअर चोराला पोलिसांनी पकडले असून, त्याला यामागील कारण विचारले असता ते ऐकून पोलीसही अवाक झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इमारतीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनींचे अंडरगार्मेंट्स गायब होऊ लागले. त्यांनी इमारतीच्या मालकाकडे याची तक्रार केली. इमारत मालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यांना धक्काच बसला. एक युवक महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. त्याने विद्यार्थिनींच्या घराजवळ त्याची दुचाकी थांबवली आणि अंतर्वस्त्र चोरले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या युवकाला पकडले आहे. संबंधित युवक हा इंजिनीअर आहे. शरत (वय २५) असे त्याचे नाव आहे. त्याने शहरातील अनेक ठिकाणी अंतर्वस्त्रे चोरल्याची कबुली दिली आहे. त्याने शहरातील एसआयटी क्षेत्र, एसएस पुरम आणि अशोक नगरमधील घरांमधून महिलांचे अंतर्वस्त्र चोरली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या घरी पोहोचून त्याच्या या कृत्याबाबत सांगितले, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनाही धक्का बसला. कुटुंबातील सदस्यांना शरतच्या वागण्याबद्दल माहिती नव्हती.
सुशिक्षित कुटुंबातील असूनही शरत असं का करत होता, असा प्रश्न पोलिसांनाही पडला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ते सुद्धा अवाक झाले. पोलिसांनी सांगितले की त्याला ब्लू फिल्म पाहण्याचे व्यसन होते. नंतर पोलिसांनी शरतला जामिनावर सोडले आणि भविष्यात अशा प्रकारचे कृत्य न करण्याचा इशारा दिला आहे.
प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद…
धक्कादायक! व्यावसायिकाला शारिरीक संबंधासाठी सख्ख्या बहिणींनी घरी बोलावले अन्…
सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…
इन्स्टाग्रामवरून ओळख अन् लॉजमध्ये शारिरीक संबंध; तक्रार दाखल…
सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…

