
पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये एका पोलिसाने पत्नीलाच हॉट असल्याचा मेसेज केला. संबंधित पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पतीनं इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार करून त्यावरून स्वतःच्याच पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवले. त्या खात्याची चौकशी केली असता ते खातं महिलेच्या कॉन्स्टेबल पतीचंच असल्याचे लक्षात आले. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत.
कॉन्स्टेबल नवऱ्याला पत्नीच्या चारित्र्याविषयी शंका होती. त्याच संशयातून त्यानं इन्स्टाग्रामवर बनावट आयडीद्वारे खातं उघडले. त्या खात्यावरून तो पत्नीला अश्लील मेसेज करू लागला. पत्नी त्याला उत्तर देईल असे त्याला वाटलं; मात्र पत्नीने त्या मेसेजेसना उत्तर दिले नाही. उलट पत्नीने थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारच दाखल केली.
पत्नीने 21 जून 2024 रोजी हरदोईमधल्या सायबर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. त्यात गौरव कुमार नावाच्या आयडीची व्यक्ती इन्स्टाग्रामवरून तिला अश्लील मेसेज पाठवत असल्याचे तिने म्हटले होते. ‘वहिनी तुम्ही खूप हॉट आहात’ अशा पद्धतीचे मेसेज ती व्यक्ती पाठवत होती. तिच्याशी संबंध तयार करण्याचे प्रयत्न करत होती; मात्र आपण त्या व्यक्तीला ओळखत देखील नाही. तसेच मेसेजला उत्तर देत नाही, तरीही तो मेसेज करतो असे महिलेने म्हटले होते. त्या व्यक्तीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक करूनही त्यानं दुसऱ्या आयडीवरून तिला मेसेज करायला सुरुवात केली. त्याचा त्रास होत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते.
महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केली असता तो इन्स्टाग्राम आयडी रायबरेली पोलिस लाइनमध्ये नोकरीला असलेल्या राकेशकुमार या कॉन्स्टेबलने काढल्याचे लक्षात आले. राकेशकुमार हा त्या महिलेचा पतीच आहे. महिला आणि तिच्या पतीमध्ये काही वाद सुरू असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. महिलेने पती अश्लील मेसेज करत असल्याची आणखी एक तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात राकेशकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…
प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…
मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…
पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…
लॉजवर अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध सुरू असताना झाला मृत्यू…

