
प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर…
ठाणे : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सीमा कांबळे (वय ३५, रा. बारकूपाडा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर (वय २९) यांचे 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, सीमाने राहुलला हातउसने पैसे दिले होते. मात्र, तिच्याकडून पैशाचा तगादा लावल्यात येत होता. उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा महिला लावत असल्याच्या वादातून त्याने सीमाची भरदिवसा रेल्वे स्थानकावर हत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. राहुल आणि सीमा यांच्यात प्रेमसंबंध होते, गेल्या सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमा हिच्या 13 वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशी धक्कादायक बाब आता पोलिस तपासातून पुढे आली आहे. सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघींमध्ये वाद सुरू होते, राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल, अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती.
सीमा कांबळे ही तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर, सीमाचे प्रेमसंबंध राहुल अरुण भिंगारकर या युवकासोबत जुळले. सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशीही धक्कादायक बाब आता पोलिस तपासातून पुढे आली आहे. राहुल हा कर्जबाजारी होता, कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता. तर, सीमाचेही राहुलवर प्रेम असल्याने सीमाने जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते.
सीमाला राहुलने लग्नाचे आमिष दाखवले होते, त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते, राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला माहिती होते. यावरून सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते, राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल, अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती. त्यानंतर, राहुल लग्न करणार नसल्यामुळे माझे दिलेले पैसे दे, असा तगादा सीमाने लावला. सीमाच्या बहिणीने तो लग्न करत नसला तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे, असा सल्ला दिला होता.
दरम्यान, राहुल याने सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देतो, असे फोनवरून सांगितले. त्यावरुन ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघे पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले, राहुल तुला संपवणार आहे, असे सीमाने तिच्या बहिणीला सांगितले होते. सीमाला संपवण्याच्या तयारीत आलेल्या राहुलने ब्रिजजवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद घालायला सुरवात केली. दोघांमधील वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्राने भर दिवसा सपासप वार केले. या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली. सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
अंबरनाथमध्ये युवकाने सपासप वार करत घेतला युवतीचा जीव…
युवतीची क्रूरपणे हत्या, निर्वस्त्र, बरगड्या तुटलेल्या अन् संपूर्ण शरिरावर जखमा…
सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार…
पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…
बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…

