पुणे! IT इंजिनिअर युवतीवर मित्रांनी केला सामूहिक अत्याचार अन्…

पुणे: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका IT कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित युवतीच्या प्रियकराने आधी कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, यानंतर त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, यानंतर चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रियकर तमीम हरसल्ला खान याच्यासह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित युवती ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. पीडित युवती आणि आरोपी मुंबईतील कांदिवली भेटले. दोघंही एका हॉटेलमध्ये राहिले. यावेळी आरोपीने पीडितेला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. युवतीला गुंगी चढल्यानंतर आरोपीने तिच्याशी जबदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तो कारने पीडितेला पुण्याला घेऊन आला. येथेही त्यांनी पीडितेवर अत्याचार केला.

आरोपी तमीमने कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या इतर तीन मित्रांना देखील बोलावून घेतले. यानंतर चारही जणांनी आळीपाळीने युवतीवर लैंगिक अत्याचार केला. शिवाय, त्यांनी पीडित युवतीचे अश्लील फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेकडून तब्बल ३० लाख रुपये उकळले. तसेच त्यांनी पीडितेकडून दोन आयफोन देखील घेतले. मागील अनेक महिन्यांपासून हे ब्लॅकमेलिंक सुरू होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुख्य आरोपी प्रियकर तमीम खान याच्यासह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मुंबईच्या कांदिवली परिसरात घडल्याने हे प्रकरण कांदिवली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इन्स्टाग्रामवरून ओळख अन् लॉजमध्ये शारिरीक संबंध; तक्रार दाखल…

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार…

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!