कोंढवा पोलिसांनी 2 तासांत हत्यारासह आरोपींना केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिसांनी अवघ्या 2 तासात हत्यारासह आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 23/10/2023 रोजी पूना डाईग्नोस्टीक सेंटर, सोमजी, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे तीन अज्ञातांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली तसेच तपासणी साठी आलेले सुरेश मोतीलाल सहा यांना कोयत्याने मारहाण केली म्हणून कोंढवा पोलिस येथे 1091/2023 भा द वी गुन्हा 326,506,427,34 ,महा पोलिस आधी कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

वरिष्ठांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता पोलिस हवा अमोल हिरवे, पोलिस अम शशांक खाडे यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी खडी मशीन चौक येथे येणार आहेत. घटनास्थळी जाऊन आरोपी
1) आशिष सुरेश दुधनिकर (वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे)
2) धीरज लहू धेले (वय 19 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे)
3) अक्षय प्रताप निकम (वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे) यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 तासात हत्यारासह ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस स्टेशन येथे आणले असता त्यांनी लॅब व्यवसायाचे कारणावरून सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.

सदर कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त, रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग विक्रांत देशमुख पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 5, शाहूराजे साळवे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शना खाली लेखाजी शिंदे, पो हवा अमोल हिरवे, पो अम वंजारी, पो अम रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे,पो अम भोसले, पो अम पाटील, पो अम गरुड,पो अम मोरे, पो अम थोरात, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

कोंढवा पोलिस स्टेशन येथे सर्वधर्म समभाव आरतीचे आयोजन!

एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात सोनसाखळया चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद…

पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!