प्रेम आणि धमकी! FB लाइव्ह करत युवकाने मारली नदीत उडी अन्…

नागपूर : पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीच्या त्रासाला कंटाळून युवकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी युवकाने फेसबुक लाइव्ह करत आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप खोटे असून महिलेसह तिचे कुटुंबीय त्रास देत असल्याचे म्हटले आहे. मनीष रामपाल यादव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

मनीष याचे एका युवतीसोबत (वय १९) प्रेम संबंध होते. युवतीच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी बलात्कार केल्याची तक्रार करू म्हणत पाच लाख रुपये देण्यासाठी तगादा लावला होता. सतत धमक्या आणि फोन कॉल्सला कंटाळून मनीष यादव याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करून हा सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांसह चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मनिष यादवने फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले की, ‘फक्त पैशांसाठी माझ्याविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं चांगलं चाललं, कमाई होतेय. हे पाहून माझ्यावर बलात्काराची खोटी तक्रार दिली जात आहे. मुलीसोबत शारिरीक संबंध नव्हते तरीही तिच्या घरच्यांकडून धमकी दिली जात आहे. मुलगी, आई, वडील आणि फोटो स्टुडिओवाला मिळून मला धमकी देतायत. तू पाच लाख रुपये दे तरच तुझ्यावरची तक्रार मागे घेतो. सतत फोन करून त्रास देत आहेत. पाच लाख रुपये दिले नाहीस तर तुझ्यावरची केस मागे घेणार नाही. मला फसवत आहेत आणि मला धमक्या देत आहेत.’

‘मी त्यांना पाच लाख रुपये द्यावेत आणि सुटका करून घ्यावी. मी जर काहीच संबंध ठेवले नसतील तर मी कशासाठी पाच लाख रुपये द्यावेत. मी एकच विनंती करेन युवतीसह या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. माझ्या आत्महत्येनंतर कुटुंब उद्ध्वस्त होईल. याला फक्त चौघेच जबाबदार आहेत. मी माझी तीन मुलं सोडून जातोय. किमान आरोपींना शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे. पाच लाख रुपये द्या अशी सतत धमकी दिली जातेय. माझ्याकडे खिशात पाच हजार रुपये नाहीत,’ असेही मनिष याने फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मनिष यादव नावाच्या युवकाने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

थरार! दोन मित्रांवर सात ते आठ जणांनी केले सपासप वार…

इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…

नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून; पण…

प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!