Video: समाजसेवकाला महिलांची बेदम मारहाण…
छ. संभाजीनगर: समाजसेवकाने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत समाजसेवकाची काही महिलांनी धुलाई केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब महिलेने विचारला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर तीन महिला एका व्यक्तीला रस्त्यावर फिरवत मारहाण करत आहेत. याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यामध्ये परस्पराविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजसेवकाला महिलांची बेदम मारहाण…https://t.co/42LUDp7gg7 pic.twitter.com/IKP3HjVmBI
— policekaka News (@policekaka) July 26, 2023