Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात कोयता गॅंगची दहशतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोयता गॅंगने केलेल्या हल्ल्यात एक युवक जखमी झाला आहे.

हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने युवकावर हल्ला केला आहे. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात 23 वर्षीय युवक जखमी झाला. हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन टोळके आणि मिलिंद नावाच्या तरुणामध्ये यांच्यात वाद झाला होता. वादानंतर टोळक्याने हातात कोयते घेत मिलिंद राहत असलेल्या परिसरात येवून हल्ला केला. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, कोयता गॅंगने हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. एका दुचाकीवर तब्बल चार जण बसून पळत जाताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दांडेकर पूल भागात कोयता गँगची दहशत…

Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…

कारवाई! पुणे शहरात युवतीवर कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते?

पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…

बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले…

बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!