केसनंद येथे गुन्हे शाखा युनिट ६ने केला तडीपार आरोपी जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): केसनंद येथे एका तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट ६ला यश आले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला वाघोली पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलिस उप-निरीक्षक दळवी, ऋषीकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर असे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार गणेश काळे हा महादेव मंदिर शेजारी, शिवशंभो नगर, लाडबा वस्ती, केसनंद येथे थांबलेला आहे. खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यास शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. गणेश रामदास काळे (वय 34 वर्षे रा. वाघेश्वर नगर, गायरान वस्ती, वाघोली, पुणे) असे त्याने नाव सांगितले. सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याचेवर लोणीकंद पोलिस ठाणे येथे जबरी चोरी ( सह मोक्का ), गंभीर दुखापत, म पो का १४२ कारवाई यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यास तडीपार आदेश क्र.52/2022 नुसार मुंबई पोलिस अधिनियम कलम 56 (1),(अ)(ब) प्रमाणे 28/10/2022 रोजी पासुन 02 वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले होते. परिसरात तो मिळून आल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 142 अन्वये वाघोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास करणेकामी वाघोली पोलिस स्टेशनचे स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.

पुण्यात सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती; पाहा नावे…

पुणे शहरातील नागरिकांनी टेकडीवर घडलेल्या गुन्ह्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना…

पुणे पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी केली कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…

पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!