अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताचा Video समोर आला होता. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याने विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली? याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते. सदर व्हिडीओ चित्रीत करणारा युवक समोर आला असून पोलिसांनी त्याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या युवकाचे नाव आर्यन असून तो नुकताच गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. आर्यनने सहज रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे संबंधित व्हिडिओ जगासमोर आला आहे. त्यानंतर विमानतळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यही समोर आले होते. मात्र आर्यनच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ अगदी जवळून काढल्याचे दिसत होते. यामुळे आर्यन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास केला जाणार आहे.

आर्यन हा गावावरून अहमदाबाद येथील नातेवाईकांच्या घरी आला होता. केवळ उत्सुकतेपोटी आर्यन व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. विमान जवळून जात असल्याचे व्हिडीओ गावातील मित्रांना दाखवायचे होते, त्यामुळे आपण रेकॉर्ड करत असल्याचे सांगितले. विमान आकाशात उडताना पाहून कुतूहल वाटत होते. मीही एकदिवस विमानात बसेल असे स्वप्न पाहत होतो. मात्र जेव्हा विमानाचा स्फोट होताना पाहिले, तेव्हापासून विमानात कधीही बसणार नसल्याचे सांगत आहे. आर्यनच्या बहिणीने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आर्यन उत्सुकतेपोटी व्हिडीओ काढत होता. मात्र जसा विमानाचा स्फोट झाला, तेव्हा त्याने व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद केले. स्फोट झाल्यामुळे तो खूप घाबरला होता.

पोलिसांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या शेजारच्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आर्यन गावावरून आला असल्यामुळे त्याच्यासाठी विमान उडताना पाहणे नवीन होते, म्हणून तो व्हिडीओ काढत असल्याचे शेजाऱ्यांनीही सांगितले. तसेच स्फोट झाल्यानंतर आम्हाला आवाज ऐकू आला नाही. मात्र, नंतर काळ्या धुराचे लोट दिसू लागल्यावर स्फोट झाल्याचे कळले.

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…

अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…

अहमदाबाद विमान अपघात! जळालेले मृतदेह अन् पायलटचा शेवटचा मेसेज…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!