अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात राजस्थानच्या बांसवाडा येथील एका डॉक्टर दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब विमान अपघातात मृत्युमुखी पडले. या अपघातात डॉक्टर दाम्पत्य आणि तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी डॉ. कोनी आणि तीन मुलांसह एकाच विमानाने लंडनला जात होते. यावेळी विमानात अपघातापूर्वी त्यांनी सेल्फी घेतला. परंतु त्यांना हे माहित नव्हते की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल.

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉ. कोनी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. त्या त्यांच्या मुलांसह प्रद्युत जोशी, मिराया जोशी आणि नकुल जोशी राहत होत्या. डॉ. कोनी यांचे पती प्रतीक जोशी लंडनमध्ये डॉक्टर होते. डॉ. कोनी यांनाही त्यांच्या पतीसोबत लंडनला शिफ्ट व्हायचे होते. यामुळे, त्यांनी गेल्या महिन्यात रुग्णालयातून राजीनामा दिला. दरम्यान, गुरुवारी, त्या अपघातग्रस्त विमानात चढल्या आणि पती प्रतीक आणि तीन मुलांसह लंडनला रवाना होणार होत्या, परंतु या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.

अपघातापूर्वी डॉ. प्रतीक जोशी आणि कोनी जोशी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी काढला, जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला. यामुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय, संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून भावना व्यक्त करत आहेत.

अहमदाबाद विमान अपघात! जळालेले मृतदेह अन् पायलटचा शेवटचा मेसेज…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!