
अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले एअर इंडियाच्या विमानाने (AI171) आज (गुरूवार) दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी टेक ऑफ केल्यानंतर हे विमान रहिवासी भागात कोसळले. या विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. 242 जणांना घेऊन जाणाऱ्या या विमानातल्या सर्व जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 12 केबिन क्रू मेंबर्सपैकी 3 कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. अहमदाबादहून लंडनचं विमान असल्यामुळे अपर्णा महाडिक या आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीन जणही या विमानामध्ये होते.
VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from airport premises. More details are awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/qbO486KoEo
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या या विमानात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानीही होते. रुपानी हे त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. रुपानी यांची पत्नी लंडनमध्ये रहाणाऱ्या त्यांच्या मुलीसोबत आधीच तिथे होती, तर त्यांचा मुलगाही कौटुंबिक कार्यक्रमासाठी अमेरिकेहून लंडनला पोहोचला होता.
एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 230 प्रवाशांपैकी 169 प्रवासी हे भारतीय होते, तर 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगिज आणि 1 कॅनडाचा नागरिक होता. या विमानातून दोन लहान मुलंही प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान मागच्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्येच होते. आज दुपारी 1 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास विमान अहमदाबादमधल्या रहिवासी भागात असलेल्या एका हॉस्पिटलवर जाऊन कोसळले, त्यामुळे रुग्णालयातील 10 ते 12 डॉक्टरही जखमी झाले आहेत. सरकारी रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळलं, तिकडे जेवणाची मेस होती.
विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश (मे डे कॉल) दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली.
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…
Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…
भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…
Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…
स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

